पंढरपूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. राजेशजी टोपेना थेट कॉल

पंढरपूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. राजेशजी टोपेना थेट कॉल

पंढरपूर – प्रतिनिधी

पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना पेशंटच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. हे वाढते रुग्ण पाहता तालुक्यातील नागरीक भयभीत झालेले आहेतच, परंतु त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेवर देखील प्रचंड ताण पडलेला दिसुन येत आहे. पंढरपूर तालुक्यातील नागरीकांना व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना दिलासा देण्याकरिता जे जे शक्य आहे ते ते करण्याकरता आज नगरपरीषदेचे मुख्याधिकारी मा. अनिकेत मानुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. अरविंद गिराम यांची ऍड राजेश भादुले व विशाल आर्वे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. एकनाथ बोधले यांच्या काय अडचणी आहेत त्यादेखील मानोरकर यांचेकडून जाणून घेतल्या. प्रशासन पातळीवर ज्या काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक, राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे यांचे स्वीय सहाय्यक, तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांना थेट फोन लावून या सर्व समस्या त्यांच्यापर्यंत तत्काळ पोहचविण्याचे काम यावेळी भादुले वकील यांनी केले.
१} रुग्णांची वाढती संख्या पाहता कोव्हिड केअर सेंटर म्हणून नव्याने काही संस्था ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. परंतु, M.I.T. कॉलेज व आदी संस्थांचे पूर्वीचेच बील अद्यापही पेड न केल्यामुळे अशा संस्था आता सहकार्य करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे पेंडिंग बील त्वरीत अदा करण्यात करावे.

पंढरपूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. राजेशजी टोपेना थेट कॉल
पंढरपूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. राजेशजी टोपेना थेट कॉल

२} कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करण्याकरीता पन्नास बेडची मर्यादा असताना, सद्यस्थितीत तिथे तब्बल शंभर पेशंटवर उपचार करण्यात येत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर खुप ताण पडत आहे. म्हणुनच या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची उपलब्धता करून देण्यात यावी.
३} सध्या आपल्या पंढरपूर शहरासाठी एक दिवसाआड केवळ १०० लस पुरवल्या जात आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरीता लसीकरणाची मोहीम वाढवणे अत्यावश्यक झालेले आहे. म्हणुनच पंढरपूर शहराकरीता रोज पाचशे लसी पुरविण्यात याव्यात.
या व अशा आदी मागण्या जिल्हाधिकारी मा. शंभरकर साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम यावेळी भादुले वकील यांनी केले. व वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी यांना वेळोवेळी सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या