‘माझे बाबासाहेब माझा अभिमान’स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

'माझे बाबासाहेब माझा अभिमान'स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर :- प्रतिनिधी

त्रिशरण एनलाईटनमेंट फौंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पध्दतीने ‘वारस फुल्यांचे’ व ‘माझे बाबासाहेब माझा अभिमान’ यासारख्या आगळ्यावेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धे अंतर्गत स्पर्धकांना 2 मिनिटांचा त्यांचा जीवनप्रवास चित्रित करुन संस्थेला पाठवायचा होता. संस्थेच्या या स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी सहभाग नोंदवला.

'माझे बाबासाहेब माझा अभिमान'स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
माझे बाबासाहेब माझा अभिमान’स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ‘माझे बाबासाहेब माझा अभिमान’ या स्पर्धेत सर्व वयोगटातील लोकांना सुटबुट घालून हातामध्ये संविधान घेऊन दोन फोटो संस्थेच्या दिलेल्या लिंकवर पाठवायचे होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे, सोलापूर जिल्हा समन्वयक शीतल कांबळे, यांनी केले होते. दि.1मे रोजी विजेत्यांची नावे घोषित करून त्यांना विशेष बक्षिस देऊन संस्थेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पंढरपूर कोऑरडीनेटर सुरज जैयस्वाल यांनी दिली.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या