कोरोना काळातही पोलिसांच्या आशीर्वादाने पंढरपूरात मटक्याचा सुळसुळाट

कोरोना काळातही पोलिसांच्या आशीर्वादाने पंढरपूरात मटक्याचा सुळसुळाट

पंढरपूर : प्रतिनिधी
संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आले असून जळपास संपूर्ण राज्यात आर्थिक महामारीची वेळ आली आहे, तसेच हातावरचे पोट असणारे आणि अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण हे कोरोनाच्या महामारी मध्ये कमी वेळात झटपट पैसे मिळवण्यासाठी अवैध मटका बुक्की कडे युवक तरुण वळताना दिसत असून,

कोरोना काळातही पोलिसांच्या आशीर्वादाने पंढरपूरात मटक्याचा सुळसुळाट
कोरोना काळातही पोलिसांच्या आशीर्वादाने पंढरपूरात मटक्याचा सुळसुळाट

पंढरपूर परिसरात अवैध व्यवसायाने धुमाकुळ घतला आहे. ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींसाठी जाळे पसरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारी यामुळे पंढरपूर , मंगळवेढा, परिसर आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा ओढा वाढत आहे.
होय मटका अनधिकृतच धंदा आहे. कारण विनापरवाना दिवसाकाठी होणारी लाखोंची उलाढाल… खाकीला दिला जाणारा हफ्ता….सरकारला ठेंगा दाखवत कसलाही टॅक्स, महसूल न भरता केली जाणारी बक्कळ कमाई, ऐश आराम, आलिशान गाड्या, श्रीमंती आणि गैरधंदा करूनही पैसेवाला म्हणून मिळणारा मान…यामुळेच मटका अनधिकृत धंदाच आहे.
मटक्याचेही राजकारण, अर्थकारण जोरदार असतं. मटक्याची कंपनी चालवायला लागणारे लाखोंचं भांडवल, भागीदार, ऑफिस, कामगारवर्ग, चिठ्ठी पोचवणारे पायलट, वसुली कर्मचारी, छोटे- मोठे टपरीवाले विक्रेते, मटका लावणारे खेळाडू, कॉम्प्युटर, फोन, खाकीला हफ्ता, हफ्ता घेणाऱ्यांचे भागीदार वरिष्ठ-कनिष्ठ असे कित्येकजण मटक्याच्या व्यवहारांवर जगत असतात. पंढरपूर शहरातील वरिष्ठ पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैद्य धंदे खुलेआम चालू करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.त्यामुळे आजकाल अनेक तरुण युवकांना राणी झोपू देईना आणि बादशहा जगू देना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या