महापौर, सभागृहनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे स्मार्टसीटीच्या कार्यालया बाहेर निदर्शने

महापौर, सभागृहनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे स्मार्टसीटीच्या कार्यालया बाहेर निदर्शने

सोलापूर :प्रतिनिधी

सोलापूर – स्मार्टसीटीचे असलेली कामे हे नियोजन शून्य सुरू आहे. या कारभारामुळे नागरीकांना नाहक त्रास होत आहे. गेली कित्येक महिने झाले निवेदन देऊन ही कोणतीही सुधारणा कामामध्ये होत नाही. याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजन भवन स्मार्टसीटी कार्यालय येथे निदर्शने आंदोलन केले. यावेळी सोलापूर शहरामध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीला स्मार्टसीटीचे सीईओ त्रिम्बक ढेंगळे पाटील हे वेळ देत नाहीत. पंप हाऊचे डिजाईन किती केलेले नाही व त्याची मिटिंग घेतली का? आतापर्यंत स्मार्टसीटीच्या भोंगळ व अपुऱ्या अर्धवट कामामुळे सोलापूर शहरात 3 ते 4 निष्पाप बळी गेलेले आहेत. स्मार्टसिटीची कामाची मुदत मार्चमध्ये संपलेली आहे. 6 महिने मुदत वाढ देऊनही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत व 6 महिन्याचा विलंब झालेला आहे. सोलापूर महानगरपालिकेची बदनामी करण्यासाठी आपण आलेले आहत का असा प्रश्न महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी विचारला.

येणाऱ्या काळात दोन खासदार आणि आमदार यांच्यामाध्यमातून दिल्लीत अधिवेशनामध्ये एक डेलिगेशन पाठवुन या कामाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. सोलापुरातला सचिन वाझें हा सीईओ रुपात आलेला आहे असा आरोप डॉ.किरण देशमुख यांनी केला आहे.

महापौर, सभागृहनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे स्मार्टसीटीच्या कार्यालया बाहेर निदर्शने
महापौर, सभागृहनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे स्मार्टसीटीच्या कार्यालया बाहेर निदर्शने

स्मार्ट सिटी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील सुंदर योजना आहे मात्र सोलापुरात या योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे त्यामुळे या योजनेत आजवर झालेला खर्च, त्या कामाची गुणवत्ता, याबाबत केंद्राच्या तसेच राज्याच्या पथकाकडून तपासणी करावी आणि संबंधीत अधिकाऱ्याला बडतर्फ करावे असे मत माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी मांडले.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक डॉ.किरण देशमुख, नागेश भोगडे, माजी सभागृहनेते सुरेश पाटील, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, विनायक विटकर, नारायण बनसोडे अविनाश पाटील, अमर पुदाले, राजेश अनगेरी, वैभव हततुरे, नगरसेविका, वंदनाताई गायकवाड, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, निर्मला तांबे, राजश्री कणके, सोनाली मुटकरी, संगीता जाधव, सुरेखा काकडे, देवी झाडबुके, बिज्जू अण्णा प्रधाने, श्रीनिवास पुरुड, अजितभाऊ गायकवाड, गिरीष बततुल, सतीश महाले, आदीजन उपस्थित होते.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या