डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले विद्यार्थ्यांना फेसबुक द्वारे लाईव्ह मार्गदर्शन

डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले विद्यार्थ्यांना फेसबुक द्वारे लाईव्ह मार्गदर्शन

पंढरपूर– प्रतिनिधी

‘नोकरीच्या संधी जास्त असणारे व वाढते क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकीचे क्षेत्र असून पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच पुढील निर्णय घ्यावेत. केवळ भावनेच्या आहारी न जाता वस्तुस्थिती काय आहे याचा विचार करून निर्णय घ्यावेत. फार्मसीच्या तुलनेने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत. यासाठी चांगले अभियांत्रिकी महाविद्यालय निवडताना विद्यार्थी व पालकांनी एखाद्या महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा, उत्कृष्ट प्लेसमेंट, उत्कृष्ट संशोधने, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट मानांकने, उच्च शिक्षण घेतलेल्या शिक्षक वर्गाची संख्या, शिक्षण संस्कृती व मागील वर्षांमध्ये शासनाच्या प्रवेश प्रक्रियेतून झालेली अलॉटमेंट या प्रमुख आठ बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून या बाबींची खात्री करूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्या.’ असे प्रतिपादन श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर यांनी केले.

डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले विद्यार्थ्यांना फेसबुक द्वारे लाईव्ह मार्गदर्शन
डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले विद्यार्थ्यांना फेसबुक द्वारे लाईव्ह मार्गदर्शन

 

स्वेरीच्या वतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी स्वेरीची व डॉ. रोंगे सरांची ओळख करून देऊन त्यांचा तंत्रशिक्षणातील दांडगा अनुभव, स्वेरीला मिळालेली मानांकने, संशोधने, मिळालेला निधी, सोयी सुविधा, कमवा व शिका योजना आदी बाबत सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीने प्रत्येक वर्षी विद्यापीठ परीक्षांच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून यंदाच्या वर्षी १६ विद्यार्थ्यांना दहा पैकी दहा सीजीपीए मिळाले असून ४४६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळवली तर स्वेरीतील १८ विद्यार्थिनींना एआयसीटीई कडून प्रत्येकी रु. पन्नास हजार प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. हा देखील एक नवा विक्रम आहे. दहा पैकी दहा एसजीपीए तब्बल ९३ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय निवडताना प्लेसमेंटची परंपराही विचारात घेणे आवश्यक आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी इंजिनिअरिंग कॉलेज निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी ‘नेमके काय पहावे’ हे स्पष्ट केले. पुढे सांगताना डॉ. रोंगे यांनी ‘स्वेरीचे संशोधन प्रकल्प, त्यासाठी मिळालेला रु.९ कोटीपेक्षा अधिक संशोधन निधी, स्वेरीच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये एकूण २२ प्राध्यापकांना तर स्वेरीतील सर्व महाविद्यालये मिळून २९ प्राध्यापकांना असलेली पीएच.डी., स्वेरीच्या प्राध्यापकांची प्रकाशित ४० पुस्तके, प्राध्यापकांनी दाखल केलेले १५ पेटंट्स तसेच स्वेरीतील उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर, वसतिगृह सुविधा, ५८ सुसज्ज प्रयोगशाळा याबाबत माहिती दिली. महाविद्यालय कॅम्पस मधील वायफाय, डिजिटल लायब्ररी, अभ्यासिका, इनडोअर स्पोर्टस क्लब, ४०० केडब्ल्यूव्ही क्षमतेचा रुफटॉप सोलर प्लांट, जीम, एनबीए मानांकन, आदरयुक्त संस्कृती, रँगिंग फ्री कल्चर, व्यसनमुक्त परिसर, मुलींच्या दृष्टीने सुरक्षित कॅम्पस, ट्युशन फ्री कल्चर, कमवा व शिका योजना या व अशा अनेक उपक्रमांबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी शासनाच्या कॅप फेरींमध्ये स्वेरीला सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त सीट्स अलॉटमेंट झाली आहे. विद्यापीठाच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांनी आपली फसगत करून घेऊ नये तर वस्तुस्थिती जाणून योग्य निर्णय घ्यावेत. असे सांगून ‘इंजिनिअरींग मध्ये प्रत्येक शाखा चांगल्या आहेत. प्रचंड कष्ट करत राहिलो तर प्रत्येक ब्रँच चांगली आहे. ब्रँच पेक्षा महाविद्यालयाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी स्वेरीविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नुसती डिग्री घेऊन उपयोग नाही तर त्या डिग्रीचा करिअरसाठी चांगला वापर व्हावा. व्यावसायिक शिक्षण घेताना आर्थिक अडचणी असल्या तरी त्यासाठी शैक्षणिक कर्जाचा पर्याय आहे, असे सांगून त्याबाबतही माहिती दिली. विद्यार्थी व पालक यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत खुलासा करताना विद्यार्थ्यांनी आपला लॉगीन आयडी व पासवर्ड कोणालाही देऊ नये’ असे आवाहन केले. ज्या महाविद्यालयांचे प्रवेश होत नाही अथवा कमी प्रवेश होतात अशा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वेरीविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी डॉ. रोंगे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. स्वेरीने ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमाचे आयोजन करून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महत्वाची माहिती दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या