सोलापूर जिल्हा विधान परिषद लांबणीवर नगरसेवक,झेडपीसदस्य व 415मतदारांच्या स्वप्नावर फिरले पाणी
सोलापूर : प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणूक लागणार असल्याची चर्चा जोरदार चालू होती, या चर्चेला आता पूर्णविराम लागल्याचे चित्र दिसत आहे सोलापूर व अहमदनगर वगळता राज्यातील सात मतदार संघाच्या सहा जागेसाठी विधानपरिषद निवडणूक मंगळवारी जाहीर केली आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतदार संख्या 75 टक्क्यांच्या आत असल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक घेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीवर सर्वांचा डोळा होता.
मात्र ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांच्या आशेवर पाणी फेरले, स्वप्नांचा चुराडा झाला, केवळ या सर्वांच्या डोळ्यातून पाणी येणे बाकी होते असे चित्र सध्या दिसत आहे.