भारत निवडणूक आयोगाकडून ‘सोलापूर विधानपरिषदे’ च्या तक्रारीची दखल
पंढरपूर : प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणूक लागणार असल्याची चर्चा जोरदार चालू होती, या चर्चेला आता मागील आठवड्यात पूर्णविराम लागला आहे,सोलापूर व अहमदनगर वगळता राज्यातील सात मतदार संघाच्या सहा जागेसाठी विधानपरिषद निवडणूक मागील आठवड्यात जाहीर केली आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतदार संख्या 75 टक्क्यांच्या आत असल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक घेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते.
त्या.पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे काही नेते,नगरसेवक, जिल्हा परिषदसदस्य, पंचायत समिती सदस्य, बरोबरच संतोष पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणी भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेत, भारत निवडणूक आयोगाने आपल्याकडे तक्रार दाखल करून घेतली आहे. संतोष पाटील यांच्या तक्रारीबाबत म्हणणे ऐकून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा यांची नेमणूक मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली होती. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
विधानपरिषद निवडणूक होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्याने अहवाल मागविण्याच्या सूचना कराव्या.
सध्याच्या मतदारांचा कार्यकाळ येणाऱ्या जानेवारीमध्ये संपणार असून, त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. याच मतदारांना मतदान करण्याचा अधिकार निवडणूक कधी ही होवो तो पर्यंत कायम ठेवावा असा महत्त्वाचा मुद्दा या तक्रारीमध्ये मांडण्यात आला.
पण तरीही राज्य शासनाकडून विधान परिषदेच्या मतदानाची टक्केवारी ही 75 टक्यांच्या आत दाखवली आहे, खरे तर असे नसून ही टक्केवारी 82.82% असल्याची माहिती भाजप नेते संतोष पाटील यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी बोलताना दिली.
तसेच ही निवडणूक लागणारच असेही त्यानी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले.