‘शेतकऱ्यांचा राजवाडा’ विठ्ठलला वाचवण्यासाठी परिचारक घालणार का लक्ष…?


पंढरपूर : प्रतिनिधी
विठ्ठल कारखान्याला पुन्हा एकदा गतवैभव मिळवण्यासाठी काल कै.औदुंबर अण्णा यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन युवराज दादा पाटील यांच्या वतीने विठ्ठल कारखान्याचे संचालक, शेतकरी व सभासदांचा महामेळावा घेण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील मोठी राजकीय शक्ती असणारा विठ्ठल कारखाना हा कै.भारत नाना भालके यांच्या अकाली निधना नंतर सैरभैर झाला आहे, त्यातच विठ्ठल कारखान्यावर असलेले पहिले कर्ज फेडून विठ्ठल कारखाना पुन्हा एकदा कसा उभा केला जाईल याच्यावर काल मेळाव्यात जोरदार चर्चा झाली, तसेच अनेकांनी औदुंबरआण्णा यांच्या आठवणीला उजाळा देत विठ्ठल कारखान्या विषयी माहिती दिली, जर विठ्ठल कारखाना पुन्हा उभा करायचा असेल तर, औदुंबरअण्णा च्या घराकडे विठ्ठल कारखाना आला पाहिजे असे मत अनेक शेतकरी सभासद व संचालकांनी व्यक्त केले, त्यातच धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी स्वतःचा कारखान्यावर कर्ज काडु पण विठ्ठल कारखाना सुरू करू असे आव्हान केले, तसेच अनेक शेतकरी व संचालकांनी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणीला उजाळा दिला. पंतांनी देखील विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासद वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या देखील कामाची दखल घेत सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन विठ्ठल कारखाना हा पुन्हा एकदा सुरु करावा असे मत शेतकरी,संचालक व सभासदाने व्यक्त केले,
त्यातच कैलास वासी सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार म्हणून आमदार प्रशांत परिचारक व युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युटोपियन सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग सहकारी साखर कारखाना उत्कृष्ट पद्धतीने चालला असून देशातील सर्वकृष्ट कारखाना म्हणून त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे, तर दुसरीकडे युटोपियन कारखाना देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे आता शेतकरी संचालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांचे विठ्ठलशी असलेले नाते आणि औदुंबर आण्णा पाटील यांच्या सोबत विठ्ठल


सभासद उभारण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेता, आ.प्रशांत परिचारक व चेअरमन उमेश परिचारक, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा राजवाडा पुन्हा सुरू करण्यासाठी विठ्ठल मध्ये लक्ष घालणार का याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे संचालकांचे आणि सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.