बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर आता उद्यापासून (सोमवारी) विशेष मोहिमेतून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक आर्वे यांनी त्यासंबंधीचे स्वतंत्र आदेश रविवारी काढले.परिवहन आयुक्‍तालयाने बेशिस्त वाहनांवरील दंडात्मक रकमेत मोठी वाढ केली आहे. त्याचा आधार घेऊन पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी शहरातील अपघात व बेशिस्त वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने अगोदर प्रबोधन आणि नंतर दंडात्मक कारवाई सुरु केली होती.मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवेदनानंतर कारवाई थांबविण्यात आली. मात्र, सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर एक-दोन किलोमीटर अंतरावर प्रवास करताना शेकडोवेळा ब्रेक लावावा लागतो, असा अनुभव अनेकांना येतो. वेगात जाणारी रिक्षा अचानक रस्त्यावरच उभी केली जाते. दुसरीकडे दुचाकीस्वारांकडूनही अनेकदा नियमांचा भंग केला जातो. रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व माल वाहून नेला जातो. रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत, बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने शहर पोलिस आयुक्‍तांनी पुन्हा कारवाईची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. हेल्मेट, ट्रिपलसीट, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, मोबाइल टॉकिंग, वाहनाचा विमा नाही, वाहन चालविण्याचा परवाना नाही, अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार असून रोखीने अथवा ऑनलाइन पध्दतीने जागेवर दंड न भरणाऱ्यांची वाहने जमा केली जाणार आहेत.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या