“करियर कट्टा” या उपक्रमा अंतर्गत कर्मयोगी मधून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील : रोहन परिचारक
पंढरपूर: प्रतिनिधी
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते आणि त्यातून च भविष्यामद्धे कर्मयोगीतून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील असे प्रतिपादान श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी केले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक १६ जानेवारी रोजी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “करियर कट्टा” ची स्थापना करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय नाममात्र शुल्कामध्ये “आयएएस आपल्या भेटीला” व “उद्योजक आपल्या भेटीला” हे अतिशय लोकप्रिय असे उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यांना फक्त वार्षिक रुपये ३६५ मध्ये ४०० तासांचा ऑनलाइन उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना करियर कट्टा या उपक्रमात नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगारीभिमुख, कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असणारे विविध कोर्स ऑनलाइन माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिले आहेत. कोर्स पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे काम देखील करियर कट्टा या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. “करियर कट्टा” चे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सुनील गायकवाड यांनी या उपक्रमाचा उद्देश आणि महत्व संगितले. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी “उद्योजक आपल्या भेटीला” हा उपक्रम करियर कट्टा तर्फे ऑनलाइन राबविला जातो. या मध्ये रोज एक यशस्वी उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, “करियर कट्टा” चे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. एस एस गायकवाड संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.