पालकमंत्री भरणे यांच्या नियोजित दौऱ्यात ना आग, ना पाणी ना महापालिका प्रश्नावर बैठकीचा उल्लेख जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं?

पालकमंत्री भरणे यांच्या नियोजित दौऱ्यात ना आग, ना पाणी ना महापालिका प्रश्नावर बैठकीचा उल्लेख जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं?

सोलापूर :प्रतिनिधी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुक्रवारच्या नियोजित दौऱ्यात  सोलापूर शहरातील  ना आग, ना पाणी,  ना महापालिका प्रश्नावर बैठकीचा उल्लेख नाही. यामुळे सोलापूर शहरात एक ना अनेक प्रश्न भेडसावत असताना पालकमंत्री भरणे यांनी त्याकडे काना डोळा केला असल्याचे नियोजित दौऱ्यावरून स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शुक्रवार १३ एप्रिल रोजीचा नियोजित दौरा काल प्रशासनाकडून जाहीर झाला. मात्र यामध्ये सोलापूर महापालिका  प्रशासन, पाणीपुरवठा , महापालिका कामगारांचे प्रलंबित प्रश्न यासंदर्भात बैठकीचा उल्लेख नाही. सर्वांत गंभीर बाब म्हणजे तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस आठ दिवसापूर्वी आग लागली.

पालकमंत्री भरणे यांच्या नियोजित दौऱ्यात ना आग, ना पाणी ना महापालिका प्रश्नावर बैठकीचा उल्लेख  जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं?
पालकमंत्री भरणे यांच्या नियोजित दौऱ्यात ना आग, ना पाणी ना महापालिका प्रश्नावर बैठकीचा उल्लेख
जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं?

सोलापूरकरांचा आरोग्य प्रश्न निर्माण झाला. आग पूर्णपणे आटोक्यात आली नाही. एवढा गंभीर प्रश्न असताना पालकमंत्री भरणे यांना यासाठी दौऱ्यात वेळ नाही. अडचणीच्या वेळी, संकटाच्या काळात पालकमंत्री कानाडोळा आणि पाठ फिरवत असल्याबद्दल नाराजी, संताप व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे तब्बल आठ दिवसांनी आगीच्या घटनास्थळी दाखल झाले. तर पालकमंत्री यांना तर दौऱ्यात शहरातील प्रश्नांसाठी वेळच नाही. याला काय म्हणावे ? अशी भावना व्यक्त होत आहे. मामा आपण पालकमंत्री या नात्याने  सोलापूरकरांचा संकटकालीन मार्ग असणं आवश्यक आहे. मात्र संकट काळात आपली भूमिका पालकत्वाची हवी हीच भाबडी अपेक्षा सामान्य सोलापूरकरांची आहे. जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या