पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी २५१५ योजनेतून प्रलंबित असणारा १ कोटी निधी मंजूर – आ समाधान आवताडे

पंढरपूर-प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या २५१५ योजनेतून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील २३ गावांसाठी मंजूर असलेला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित असणारा १ कोटी विकास कामांच्या निधीला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

राज्यातील गावांतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकास पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये २५१५ या योजनेअंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांच्या धोरणात्मक विकासासाठी निधीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तदनंतर राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आ.आवताडे यांनी या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्यानंतर हा प्रलंबित निधी मतदारसंघाच्या पदरी पडला आहे.

लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील सोयी-सुविधा मजबूत करण्याच्या अनुषंगाने सदर निधी अंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये या योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटकरण व खडीकरण, मुरमीकरण रस्ते, बंदिस्त गटार, सभा मंडप उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत बांधणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कामे मंजूर गावांची नावे, कामे व निधी 
रांझणी ते एकलासपूर रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे ३ लाख, अनवली येथील श्री.सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मुंढेवाडी येथील बिस्किटे वस्ती रस्ता उत्तम कांबळे वस्ती ते बोगळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ४ लाख, लक्ष्मी टाकळी येथील पंढरपूर रेल्वे गेट पासून अशोक देठे वस्तीपर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार बांधणे ७ लाख, कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, गादेगाव येथील लक्ष्मी नगर ते सोनके शिव खडीकरण करणे ४ लाख, कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण करणे १० लाख, शिरढोण येथील पंढरपूर सबस्टेशन ते चांगदेव व्हळघर वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे १० लाख.

मंगळवेढा तालुक्यातील मंजूर झालेल्या गावाचे नाव

रहाटेवाडी येथील श्री.हनुमान मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मुंढेवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते घोडके वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे ५ लाख, कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे ५ लाख, कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे ३ लाख, कात्राळ येथील मंगळवेढा हायवे ते कारंडे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, चोखामेळा नगर येथील धनाजी खवतोडे घर ते सोमा बुरजे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापुर शिव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ४ लाख, डोंगरगाव येथील मंगळवेढा ते खोमनाळ हेंबाडे वस्ती, पठाण वस्ती, चव्हाण वस्ती, मोरे वस्ती मार्गे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, डोणजे येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे २ लाख, मौजे आरळी येथील स्मशानभूमी बंधाऱ्या वरील सर्व रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे खवे येथील विस्टव्वा देवी ते मारुती मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे ३ लाख, आंधळगाव येथील आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते काळंबा देवी मंदिर गटार करणे २ लाख.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या