डीआरडीओ आयोजित विशेष कार्यशाळेस कर्मयोगीच्या संशोधक प्राध्यापकांचा सहभाग.*
पंढरपूर:प्रतिनिधी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पुणे, आयोजित कार्यशाळेस कर्मयोगी इंजिनीअरिंग च्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. सेंसर आणि इस्टृमेनटेशन संबंधित या कार्यशाळेचा फायदा इंजिनीअरिंगमधील संशोधांनासाठी प्राध्यापकां बरोबर च विद्यार्थ्यांना ही होणार आहे असे मत उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केले. या मध्ये भारतातील नामवंत शास्त्रज्ञ यांनी भारतीय संरक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सर्व माहिती उपस्थितांना दिली. भारताला आत्मनिर्भर बनविण्यामद्धे वापरण्यात येणार्या अत्याधुनिक तंत्रज्ञाचे ज्ञान यावेळी देण्यात आले. भारतातील मोजक्याच प्राध्यापकांसाठी आमंत्रित असलेल्या या कार्यशाळेस कर्मयोगीच्या प्राध्यापकांचा सहभाग होता ही विशेष अभिमानाची व उल्लेखनीय बाब आहे.
या कार्यशाळेमद्धे कर्मयोगीचे प्रा. जगदीश मुडेगावकर, डॉ. अभय उत्पात, प्रा. आशीष जोशी, प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. सोमनाथ लंबे या प्राध्यापकांचा सहभाग होता. यापैकी काही प्राध्यापकांची पीएचडी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चालू असून या कार्यशाळेचा त्यांना अत्यंत फायदा झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या तंत्रज्ञानातून इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये संशोधांनासाठी अत्याधुनिक उपकरणासाठी फंड उपलब्ध होणार असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना संशोधांनासाठी होणार आहे. ही कार्यशाळा प्राध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी फायदेशीर झाल्याची माहिती कर्मयोगीचे संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात यांनी संगितले. शैक्षणिक प्रगती बरोबर च कर्मयोगीचा संशोधन क्षेत्रातील वाढता आलेखाबद्दल विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके यांनी कार्यशाळेस सहभागी झालेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.