“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे प्रशाले अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न”
पंढरपूर – प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेअंतर्गत सोमवार, दि.२८.०२.२०२२ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातील प्रा.सचिन मधुकर बनसोडे व पंढरपुरचे नगरसेवक श्री नवनाथ रानगट सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
मान्यवरांच्या आगमानानंतर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना “राष्ट्रीय विज्ञान” दिनाचे महत्व सांगितले.
या प्रदर्शनात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सोलर वर आधारित प्रतिकृती, कारखान्यावर आधारित प्रतिकृती, कुलर प्रतिकृती, पाणी कुलर प्रतिकृती, गिरणी प्रतिकृती तसेच विविध प्रकारचे घरगुती वापरातील उपक्रम सदर केले.
अशा या विविध उपक्रमांना मान्यवरांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानपेक्षा दृक-गोष्टीतून उत्तम प्रकारे ज्ञान मिळते व त्याचा उपयोग पुढील जीवनास अत्यंत फायदेशीर ठरतो असे यावेळी त्या म्हणाल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व निरीक्षक प्रा.श्री.सचिन बनसोडे सरांनी विज्ञान हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून आपल्या दैनंदिन गोष्टी या विज्ञानावर आधारित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा अशा विज्ञान प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला पाहिजे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.