कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची एनटीटी डेटा या नामांकित कंपनी मध्ये निवड,मिळाले 5 लाखांचे सर्वोत्तम पॅकेज.

कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची एनटीटी डेटा या नामांकित कंपनी मध्ये निवड. मिळाले 5 लाखांचे सर्वोत्तम पॅकेज.

पंढरपूर : प्रतिनिधी

एनटीटी डेटा या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रेश्मा साळुंखे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
एनटीटी डेटा या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील रेश्मा साळुंखे या विद्यार्थिंनीची निवड करण्यात असून त्यांना वार्षिक ५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबर च कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्‍या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून प्रशिक्षीत केले जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून आज विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होताना दिसून येत आहे यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामद्धे आनंदाचे वातावरण आहे॰

कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची एनटीटी डेटा या नामांकित कंपनी मध्ये निवड. मिळाले 5 लाखांचे सर्वोत्तम पॅकेज.
कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची एनटीटी डेटा या नामांकित कंपनी मध्ये निवड.
मिळाले 5 लाखांचे सर्वोत्तम पॅकेज.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी रेश्मा साळुंखे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या