तमिळनाडू मधील आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये स्वेरीचे यश

तमिळनाडू मधील आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये स्वेरीचे यश

पंढरपूर- प्रतिनिधी

चेन्नई (तमिळनाडू) मधील श्री. शिवसुब्रमण्यम नादर अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन प्रोसेसिंग अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ मटेरियल्स’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. त्या परिषदेत स्वेरीच्या प्रा. दिगंबर काशीद यांनी सादर केलेल्या शोधनिबंधास ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’ मिळाला आहे.

तमिळनाडू मधील आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये स्वेरीचे यश
तमिळनाडू मधील आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेमध्ये स्वेरीचे यश

या परिषदेमध्ये संपूर्ण देशभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. दिगंबर तुकाराम काशीद यांनी सादर केलेल्या ‘न्यूमरिकल अॅनालिसिस ऑफ एनएसीए ४४१५ एरोफॉईल फॉर ड्रॅग लिफ्ट परफॉर्मन्स’ या विषयावरील शोधनिबंधास उत्कृष्ट शोधनिबंधाने सन्मानित करण्यात आले. या शोधनिबंधामध्ये त्यांनी सादर केलेल्या एनएसीए ४४१५ एरोफॉईल हे विंड टर्बाइन ब्लेड एरोफॉईल प्रोफाइलच्या कामगिरीची तपासणी करण्यासाठी अॅनसीस सॉफ्टवेअर वापरून एनएसीए ४४१५ एरोफॉइल प्रोफाइलचे संख्यात्मक विश्लेषण केले आहे. रेनॉल्ड्स क्रमांक आणि अँगल ऑफ अटॅक हे या अभ्यासात विचारात घेतलेले कार्यप्रदर्शन मापदंड आहेत. या विश्लेषणामध्ये अँगल ऑफ अटॅक चे भिन्न कोन वापरले गेले आहेत व रेनॉल्ड्स क्रमांक दहा हजार ते दोन लाख पर्यंत घेतला आहे. लिफ्ट कोईफीशंट, ड्रॅग कोईफीशंट, ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्सच्या संदर्भात परिणाम दर्शविले गेले आहेत. याबद्दलची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती या शोधनिबंधामध्ये प्रा. काशीद यांनी सादर केली होती. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे हे नेहमीच विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनीही जगातील बदलत्या धोरणानुसार संशोधन वृत्ती जागृत ठेवून सातत्याने कार्यरत राहण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. अशा विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्याबाबत नेहमीच त्यांचे विशेष मार्गदर्शन असते. महाविद्यालयातील संशोधन विभागाचा उपयोग विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच समाजासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांकडून स्वेरीतील प्राध्यापकांचे त्यांच्या संशोधन कार्यामुळे सातत्याने कौतुक होत असते. प्रा. दिगंबर काशीद यांच्या शोधनिबंधाला स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, जालंधर (पंजाब) मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये उच्च शिक्षण घेत असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी ऋषिकेश परिचारक, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, प्रा. सुभाष जाधव, प्रा.अविनाश पारखे, प्रा. श्रीकृष्ण भोसले, प्रा. सचिन काळे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ हा पुरस्कार मिळाल्यामुळे प्रा.काशीद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रा. काशीद यांचे अभिनंदन केले.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या