आ.प्रशांत परिचारकांची उपस्थिती,युवक नेते उमेश सर्वगोड यांचे कार्यकर्त्यांना आवाहन उद्या होणार पंढरीत भीमशक्ती मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर…!*

पंढरपूर:प्रतींनीधी

येथील भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार दिं 6डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड यांनी दिली आहे.

पंढरीत भीमशक्ती मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
  1. हा रक्तदान शिबिर कार्यक्रम सकाळी दहा वाजता येथील संतपेठ सांगोला रोड, महापूर चाळ भीमशक्ती व्यायाम शाळा येथे होणार आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक हे उपस्थित राहणार आहेत.
    या मंडळाच्या वतीने वर्षभरात नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबविले जात असतात, महिला आणि पुरुष यांच्या या रक्तदान शिबिरासाठी अध्यक्ष सुधीर सर्वगोड यांच्या सह मंडळातील सर्व कार्यकर्ते परिश्रम घेणार आहेत. तरी सर्व भीमसैनिक यांनी या रक्तदान शिबिराचे वेळी उपस्थित राहावे असे आवाहन युवानेते उमेश सर्वगोड यांनी केले आहे..

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या