कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात आणि जल्लोषात आरंभ
पंढरपूर : प्रतिनिधी
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये माघील दोन दिवसांपूर्वी क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाला.यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा सहभाग नोंदवला आहे. शालेय क्रीडा सप्ताहाची सुरुवात सर्व हाऊसच्या संचालनाने व चारही हाऊस कपटेन्सनी आणलेलं क्रीडा मशाली द्वारे क्रीडाज्योत प्रज्वलित करून प्रशालेच्या प्राचार्या माननीय सौ. प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली. प्रशालेच्या सर्व हाऊस लीडर्स क्रीडामशाल हातात घेऊन संपूर्ण मैदानावरती क्रीडामशाल फिरवली व ती क्रीडा मशाल प्राचार्यांच्या हातात देऊन प्राचार्यांनी क्रीडा मशाली द्वारे क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. यावेळी क्रीडा ध्वजांची स्थापना करण्यात आली.
आकाश हाऊस विद्यार्थी प्रमुख भक्ती पवार, अग्नी हाऊस विद्यार्थी प्रमुख आकांक्षा खजूरकर, पृथ्वी हाऊस विद्यार्थी प्रमुख श्रुती कारंडे व त्रिशूल हाऊस विद्यार्थी प्रमुख रुद्र फुलारे यांनी प्राचार्यांना मानवंदना दिली. तसेच प्राचार्यांनी क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यापूर्वी सर्व क्रीडा सहभागी विद्यार्थ्यांकडून क्रीडा सप्ताहाची शपथ म्हणून घेतली. अत्यंत उत्साहामध्ये 100 मीटर धावणे या क्रीडाप्रकार शर्यतीला सुरुवात झाली व नंतर इतर खेळ संपन्न झाले.
यावेळी क्रीडा विभाग प्रमुख श्री राजेंद्र जाधव क्रीडाशिक्षक श्री अतिश टाकेकर , सर्व हाऊसचे प्रमुख शिक्षक व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.