‘या’ स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी


पंढरपूर : येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल आज प्राप्त झाला असून ए ग्रुप मध्ये इयत्ता तिसरी 1)तक्ष तुकाराम राऊत 2)संध्या महादेव भोसले 3)अद्वय अमोल काळे ग्रुप बी 1)विराट हनुमंत चव्हाण 2)यशश्री संतोष सलगर 3)भारती लहू शिंदे इयत्ता पाचवी व सहावी. तसेच ग्रुप सी मध्ये इयत्ता सातवीचे 1)मनोज संतोष घोडके आणि 2)यश रमेश क्षीरसागर या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी केले, तर सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या माननीय सौ प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.