पंढरपूरमध्ये ५ कोटींच्या मराठा भवनाची संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणराज घाडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


पंढरपूर प्रतिनिधी:-
पंढरपूर येथे मराठा भवन उभारण्यासाठी ५ कोटी रुपये निधीची मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीदरम्यान निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या शासकीय महापुजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांच्याकडे पंढरपूरमध्ये मराठा भवनाची मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी केली आहे. सर्व सुखसुविधांसह मराठा भवन उभारण्यासाठी ५ कोटी रुपये निधीची तरतूद करून, पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा भवन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी केली आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.


“साकल्याने विचार करून, पंढरपूर येथे मराठा समाजासाठी मराठा भवनाची निर्मिती लवकरच केली जाईल!” असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.