‘कर्मयोगी’ मध्ये प्रथम वर्ष इंजिनियरिंग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा.
पंढरपूर:प्रतिनिधी
प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी (कॅप राऊंड १) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार दि. २० जुलै २०२३ पासून सुरू होणार आहे. या फेरीमधून विद्यार्थी महाविद्यालय व पसंतीची शाखा निवडू शकणार आहेत. अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे ऑप्शन फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले.
याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. अभय उत्पात म्हणाले की प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या कॅप राऊंड साठी २० जुलै ते २२ जुलै २०२३ या तारखे मध्ये विद्यार्थ्यानी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये मोफत मार्गदर्शन व ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरावा.
मोफत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात (9158325055) व प्रा. जे एल मुडेगावकर (9421090805) यांच्याशी संपर्क करावा.