राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असताना अचानकपणे मंगळवारी रात्री मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली;
मोहोळ (प्रतिनिधी )
राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असताना अचानकपणे मंगळवारी रात्री मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सुरेशकुमार राऊत यांची नियुक्ती करण्यात आली या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे .
मागील ८ महिन्या पूर्वी पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांनी मोहोळ पोलिस ठाण्याचा चार्ज घेतला होता त्यांनी चार्ज घेतल्या पासून मोहोळ शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता अधून मधून मोहोळ शाहराच्या प्रमुख मार्गावरून त्यांच्या स्टाफ सह पहाणी करित होते व वाहनांची तपासणीही केली जात होती त्यामुळे त्याचा शहराच्या वाहतुकी वरचा वचक वाढला होता बऱ्याच शाळा कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत होते त्यामुळे शाळा कॉलेज मधून मुले मुली पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते .
परंतु चिचोली काटी औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या कंपनीत मुबईचे अमली पदार्थ प्रतिबंध पथकाचे प्रमुख दया नाईक यांनी मफेड्रॉनचा मोठा साठा जप्त केला त्यानंतर मोहोळ पोलिसांनी देवडी पाटी जवळ दोन घोडकेंना ड्रग्ज विकण्यासाठी आले असता अटक केली त्यानंतर नाशिक पोलिसांनी तीन चार दिवसाच्या अंतराने चिचोली काटी औदयोगीक वसाहतीत दुसऱ्या कंपनीवर रेड केली व या ठिकणी मोठा जप्त केला . अशा परिस्थितीत पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची नियंत्रण कक्षात बदली होऊन सुरेश कुमार राऊत यांची नियुक्ती झाली त्यामुळे ड्रग्ज प्रकरण त्यांच्यावर शेकले असल्याची चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू आहे