कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये क्रीडा सप्ताहास सुरुवात
पंढरपूर-प्रतिनिधी
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये क्रीडा सप्ताहास सुरुवात*
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या क्रीडा सप्ताहास प्रारंभ झाला. या क्रीडा सप्ताहामध्ये विविध प्रकारचे खेळांच्या स्पर्धां मध्ये सांघिक खेळ, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, तसेच वैयक्तिक खेळामध्ये
थाळीफेक,गोळा फेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, अशा प्रकारच्या विविध खेळांचा समावेश आहे. आज या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रशालेच्या प्राचार्या मा. प्रियदर्शिनी सरदेसाई व प्रशालेचा विद्यार्थी प्रमुख व्यंकटेश डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक विकास सर, सर्व हाऊस मास्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरीश सर यांनी केले.