कर्मयोगी मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न.

कर्मयोगी मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न.

पंढरपूर;प्रतिनिधी
कर्मयोगी इंस्टीट्यूट मधून शिक्षण पूर्ण झालेले अनेक विद्यार्थी आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपले प्रभुत्व सिद्ध करीत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा ही नावलौकिक वाढत आहे. माजी विद्यार्थ्यानी कॉर्पोरेट क्षेत्रामधे त्यांना असलेला अनुभव, उपलब्ध असणारी संधी तसेच त्यासाठी योग्य दिशेने करावी लागणारी मेहनत यासाठीचे मार्गदर्शन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करून त्यांना यशाचा मार्ग दाखवावा असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते.

कर्मयोगी मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न.
कर्मयोगी मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न.*

कर्मयोगीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाने दि. २७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये सुमारे ५० हून अधिकमाजी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी प्रतिनिधी सूरज क्षीरसागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी कॉलेजचा व कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाच्या प्रगतीचा आढावा माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला. कर्मयोगीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातून शिक्षण पूर्ण केलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थ्यानी परदेशामद्धे यशस्वी अभियंते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजग म्हणून कार्यरत आहेत. अश्या सर्व विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिप्ती कुलकर्णी यांनी केले. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या